Coronavirus : पुण्यात 7 ‘कोरोना’बाधितांचा मृत्यू तर 205 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 248 जणांचा बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात पुण्यात तब्बल 205 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 7 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये पुण्यासह मुंबई, औरंगाबाद आणि सोलापूरचा समावेश आहे.

पुण्यात एकूण 4603 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. 170 क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये 42 रूग्ण व्हेंटिलेटवर उपचार घेत आहेत. शहरात एकुण 4603 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. त्यापैकी 1892 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत तर 2463 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत 248 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. स्थानिक प्रशासन देखील नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like