Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 785 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 4 लाख 94 हजार 830 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 22 हजार 983 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 403 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 750 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.62 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 34 हजार 511 रुग्णांपैकी 3लाख 16 हजार 628 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 721 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.65 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 404 रुग्णांपैकी 46 हजार 821 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 913 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 866 रुग्णांपैकी 40 हजार 517 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 788 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 342 रुग्णांपैकी 44 हजार 273 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 383 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 686 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 860 रुग्णांपैकी 46 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 598 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 197 वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 785 , सातारा जिल्ह्यात 107 , सोलापूर जिल्ह्यात 189, सांगली जिल्ह्यात 70 तर कोल्हापूर जिल्ह्यात 46 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 7 रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 634, सातारा जिल्ह्यामध्ये 167, सोलापूर जिल्ह्यामध्ये 102 , सांगली जिल्ह्यामध्ये 60 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 44 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 लाख 61 हजार 869 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5लाख 22 हजार 983 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 20 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )