Coronavirus : लातूरमध्ये ‘कोरोना’चे 8 रुग्ण पॉझिटिव्ह

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत लातूरमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, आता लातूरमध्ये कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काही प्रवासी लातूरमध्ये आले होते त्यापैकी 8 जणांची कोरोनाची चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण आंध्र प्रदेशचे रहिवासी असल्याचे माहिती मिळत आहे.

हे सर्वजण दिल्ली येथून आल्यानंतर निलंगा येथे थांबले होते. लोकांना त्यांचा संशय आला त्यावेळी लोकांनी प्रशासनाशी संपर्क साधून याची माहिती दिली. प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी लातूर येथे पाठवले होते. 8 जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासाठी खास सोय करण्यात आली असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून कोरोनाबाधितांचा आकडा 537 वर पोहचला आहे. आज मुंबईत 28 ठाणे 15, अमरावती 1, पुणे 2, पिंपरी-चिंचवड 1, अशा एकूण 47 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येवर नजर टाकल्यास मुंबईत सर्वाधिक 306, पुण्यात 73, ठाणे आणि एमएमआर परिसरात 70, सांगली 25, अहमदनगर 20, नागपूर 16, बुलढाणा 5, यवतमाळ 4, सातारा आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी 3, कोल्हापूर आणि रत्नागिरी प्रत्येकी 2 आणि सिंदुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशीम, जळगाव आणि अमरावती येथे प्रत्येकी एका कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे.