Coronavirus : देशातील ‘कोरोना’च्या रुग्णांची संख्या 879 वर, आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजविला आहे . त्यामुळे लोक चिंतेत आहेत . इतर देशांच्या तुलनेत भारतातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनसोबत नागरिकांच्या तपासणीला गती दिली आहे. दरम्यान कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. भारतात शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोना रोगाने मरण पावलेल्याची संख्या २० वर पोहोचली असून संसर्गित रुग्णांची संख्या ८७९ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत नवीन ७५ रुग्ण आढळले आहेत.एकीकडे भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी केरळमध्ये ३९ आणि मुंबईत कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले ९ रुग्ण आढळले. जम्मू-काश्मिरमध्ये आणखी चौघांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून यापैकी दोघे विदेशातून आले होते.