Coronavirus : देशात 24 तासात 88 नवीन रुग्ण तर एकूण 722, राज्यात सर्वाधिक 130 रुग्ण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशाभरात गुरुवारी एका दिवसात नवीन 88 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले असून आतापर्यंत 16 जणांचा मृत्यु झाला आहे. देशभरातील कोरोना बाधितांची संख्या आता 722 पर्यंत पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारत अजूनही दुसर्‍या टप्प्यात आहे़ कोरोना विषाणूचा होणारा परिणाम लक्षात घेता भारत अजूनही तिसर्‍या टप्प्यात पोहोचला नाही, ही दिलासा देणारी गोष्ट आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवार सकाळपर्यंत महाराष्ट्रातील 130 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  राज्यात दिवसभरात एकूण 20 नवे रुग्ण आढळून आले. मुंबईत सर्वाधिक 49 रुग्णांची संख्या असून मुंबई व परिसरातील 5 जणांचा मृत्यु झाला आहे.  देशातील ही स्थिती पाहून देशात 21 दिवसांचे लॉक डाऊन करण्यात आले आहे. लोकांनाही घराबाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.