Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 98 नवे पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन –  आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 446 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 348 अहवाल निगेटीव्ह तर 98 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज सात मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि. 17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 6004+1006+155=6265 झाली आहे. आज दिवसभरात 79 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 34830 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 33927, फेरतपासणीचे 195 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 708 नमुने होते. आजपर्यंत एकूण 34251 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 28247 तर पॉझिटीव्ह अहवाल 6004+1006+155=6265 आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 98 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 98 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 91 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 32 महिला व 59 पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील 15 जण, अंबुजा सिमेंट कान्हेरी गवळी येथील नऊ जण, आदर्श कॉलनी येथील सात जण, रणपिसे नगर येथील प्रत्येकी पाच जण, जुने शहर , खडकी, जीएमसी, मलकापुर, येथील प्रत्येकी तीन जण, जठारपेठ,विठ्ठल नगर, रिधोरा, गोकुल नगर, आळंदा, हिरपुर ता. मुर्तिजापुर, जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बोरगांव मंजु, पार्थडी ता. तेल्हारा , मच्छी मार्केट, पोळा चौक , जैन मार्केट कान्हेरी गवळी , मेहरे नगर, दहिगांव गांवडे , तेल्हारा , डाबकी रोड, कुरूम, सांगवामेळ ता. मुर्तिजापुर , अनभोरा , जवळा ता. मुर्तिजापुर, कुरणखेड, कपीलवस्तु नगर, कोठारी वाटिका, बाळापुर नाका , चिचोंली रूद्रायणी, जठारपेठ , म्हातोडी, बार्शिटाकळी, शास्त्रीनगर, शिवाजी विद्यालय , खोलेश्वर, रविनगर, महसुल कॉलनी, पाटणकर कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. आज सायंकाळी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व पाच पुरुष आहे. त्यातील डाबकी रोड, पत्रकार कॉलनी, गोरक्षण रोड, हिंगणी ता. अकोट, जठारपेठ, रणपिसे नगर, व अंबिका नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे., अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

सात मयत

दरम्यान आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 7 व्यक्तींचा मुत्यू झाला. यात रणपिसे नगर येथील 77 वर्षीय पुरूष असुन, त्यांना 14 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. संताजी नगर डाबकी रोड येथील 68 वर्षीय पुरूष असुन, त्यांना 10 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. माळीपुरा येथील 65 वर्षीय पुरूष असुन, त्यांना 9 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. कानशिवणी येथील 53 वर्षीय पुरूष असुन, त्यांना 14 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. अक्कलकोट जुन शहर येथील 35 वर्षीय पुरूष असुन, त्यांना 9 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला. त्यात कृषी नगर, येथील 60 वर्षीय महिला असून ती 12 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, बाळापूर येथील 68 वर्षीय पुरुष असून ते 16 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

79 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 36 जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 16 जण, आयकॉन हॉस्पीटल येथील चार जण, होटल रिझेन्सी येथून चार जण ,कोविड केअर सेंटर, अकोट येथून 10 जणांना, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून तीन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून सहा अशा एकूण 79 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1204 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 6004+1006+155=6265आहे. त्यातील 203 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 4672 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1390 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.