काय सांगता ! होय, तिनं पारदर्शक PPE किटमध्ये ‘लाँजरी’ घालून केले ‘कोरोना’बाधितांवर उपचार, नर्सवर कारवाई

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाचा वाढता कहर नागरिकांच्या चितेंत भर टाकत आहे. अमेरिकेनंतर रशियामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. एकीकडे कोरोनामुळे भितीचे वातावरण असतानाच राजधानी मॉस्कोपासून 100 मैल दक्षिणेला असणार्‍या तुला शहरामध्ये सध्या एका तरुण नर्सची चर्चा रंगली आहे. कोरोनागृस्त पुरुषांच्या वॉर्डमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या नर्सने उकडत असल्याचे सांगत पारदर्शक पीपीई कीटमध्ये अंतर्वस्त्रा घालून रुग्णांवर उपचार केले आहेत.

कोरोना वॉर्डमध्ये वापरण्यात आलेले पीपीई कीट हे पारदर्शक प्लॅस्टीकपासून बनवण्यात आले होते. त्यामुळेच नर्सचे फोटो व्हायरल झाले आहेत. यानंतर या नर्सवर रुग्णालय प्रशासनाने कारवाई केली आहे. तुला येथील कोरोनाग्रस्तांसाठीच्या रुग्णालयामधील पुरुषांच्या वॉर्डमधील नर्सचा फोटो एका रुग्णानेच सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केला. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला. याचीच दखल घेत रुग्णालय प्रशासनाने या नर्सने कामावर असताना ड्रेस कोडचे पालन केले नाही असा आरोप ठेवत तिच्यावर कारवाई केली आहे. या नर्सच्या कृत्याबद्दल वरिष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी केली असता तिने नर्सच्या ड्रेसवर पुन्हा पीपीई कीट घातल्यानंतर खूप गरम होते असल्याचे सांगितले आहे. स्थानिक आरोग्य विभागानेही नर्सने कपड्यासंदर्भातील नियामांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील आदेश दिले आहे.