Coronavirus चे आकडे देऊ लागले चांगले संकेत ! सलग तिसर्‍या दिवशी अ‍ॅक्टिव्ह केस घटल्या आणि रिकव्हरी रेट 80% च्या वर

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे जे आकडे समोर येत आहेत, त्यावरून दिसत आहे की, देशात कोरोनाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रित होण्याची शक्यता आहे. लागोपाठ तिसर्‍या दिवशी अशाप्रकारचे आकडे समोर आले आहेत, ज्यामध्ये कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या कमी दिसत आहे आणि कोरोना व्हायरसमधून रिकव्हरी दर सुद्धा 80 टक्केच्या वर पोहचला आहे. एक चांगला संकेत हा सुद्धा आहे की, कोरोनाच्या येणार्‍या नव्या प्रकरणांच्या तुलनेत आता कोरोनातून बरे होणार्‍या लोकांची संख्या वाढू लागली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यांनुसार सोमवारी लागोपाठ तिसर्‍या दिवशी कोरोना व्हायरसच्या अ‍ॅक्टिव्ह प्रकरणात घट झाली आहे., शनिवारी जे आकडे जारी झाले होते त्यामध्ये अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये 3790 ची घट नोंदली गेली होती, पुन्हा रविवारी जे आकडे जारी झाले ते पाहता अ‍ॅक्टिव्ह रूग्णांच्या संख्येत 3140 घट होती आणि आज सोमवारी जारी झालेल्या आकड्यांमध्ये अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांच्या संख्येत 7525 ची घट नोंदली गेली आहे. लागोपाठ 3 दिवसांपर्यंत अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये घट होणे हा एक चांगला संकेत आहे. देशात आता कोरोनाच्या एकुण अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या 10,03,299 आहे.

मात्र, अजूनही कोरोना व्हायरसची प्रकरणे ज्या प्रमाणात येत आहेत ते कमी नाही. जगात कोणत्याही देशांमध्ये रोज समोर येणार्‍या नव्या कोरोना रूग्णांच्या प्रकरणात भारत सर्वात पुढे आहे. मागील 24 तासात म्हणजे रविवारी सकाळी 8 ते सोमवार सकाळी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान देशभरात कोरोना व्हायरसची 88961 नवी प्रकरणे समोर आली आहेत आणि एकुण कोरोना प्रकरणांची संख्या वाढून 5487580 झाली आहे.

मात्र, कोरोनाची नवी प्रकरणे ज्या संख्येत रोज येत आहेत, त्यापेक्षा जास्त लोक आता रोज बरे होत आहेत. मागील 24 तासात देशभरात 93956 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशभरात एकुण 4396399 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट 80.11 टक्के झाला आहे. नव्या कोरोना प्रकरणांच्या तुलनेत बरे होणार्‍या लोकांची संख्या जास्त असल्याने अ‍ॅक्टिव्ह प्रकरणात घट झाली आहे.

मोत्र कोरोना व्हायरसने जीव गमावणार्‍यांची संख्या सुद्धा सतत वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अकड्यांनुसार 24 तासात 1133 लोकांनी देशभरात कोरोनामुळे जीव गमावला आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 86752 लोकांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी देशभरात विक्रमी 7.31 लाखपेक्षा जास्त कोरोना टेस्ट झाल्या आणि एकुण कोरोना व्हायरस टेस्टींगचा आकडा वाढून 6.43 कोटींच्या पुढे गेला आहे. जगभरात अमेरिकेनंतर भारतातच सर्वात जास्त कोरोना टेस्ट होत आहेत.

जागतिक स्तरावर कोरोना व्हायरस प्रकरणांबाबत बोलायचे तर जगभरात एकुण प्रकरणांचा आकडा वाढून 3.12 कोटींच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत जगात कोरोना व्हायरसमुळे 9.65 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाली आहे. मात्र, संपूर्ण जगात 2.28 कोटींपेक्षा जास्त लोक कोरोना व्हायरसमधून बरे झाले आहेत.

जगभरात कोरोना व्हायरसची सर्वात जास्त प्रकरणे अमेरिकेत आहेत, जेथे 70 लाखपेक्षा जास्त केस समोर आल्या आहेत. तर 2.04 लाखांपेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे. यानंतर भारताचे स्थान आहे आणि भारतानंतर तिसर्‍या नंबरवर ब्राझील आहे, जेथे 45.44 लाख प्रकरणे समोर आली आहेत आणि 1.36 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. रशियामध्ये सुद्धा 11 लाखांपेक्षा केस समोर आल्या आहेत आणि 19 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.