Coronavirus : ‘कोरोना’ विरूध्दच्या लढाईत मदतीसाठी पुढं आला अभिनेता अर्जुन कपूर ! केली ‘ही’ विनंती

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यानं सोमवारी (दि 6 एप्रिल 2020) ट्विट करत सांगितलं की, देशात सुरू असणाऱ्या कोरोनाविरोधातील लढ्यात आपलं योगदान दिलं आहे. त्यानं चात्यांनाही योगदान देण्याची विनंती केली आहे. त्यानं सांगितलं की, त्यानं पीएम केअर्स फंड आणि गिव इंडिया नावाच्या संस्थेला दान दिलं आहे जी त्या मजूरांना रोख रक्कम देऊन त्यांची मदत करते ज्यांचा लॉकडाऊनमुळं रोजगार हिरावला गेला आहे.

अर्जुन कूपरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो, “भारत एका संकटातून जात आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या गरजू बंधु भगिणींना मदत करायला हवी. मी माझ्याकडून अधिकाधिक लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.”

पुढे बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, “आपण एकत्र येऊन कॉविड 19 सोबत लढू शकतो. तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की, पुढे या आणि आपल्या क्षमतेनुसार सहायता करा.”

याआधीच बॉलिवूड स्टार अक्षय कुमार, वरुण धवन, अनुष्का शर्मा, सलमान खान यांच्यासोबतच प्रियंका चोपडा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, सचिन तेंडुलकर अशा अनेक कलाकारांनी इतर मंडळीही या युद्धात आपापलं योगदान दिलं आहे.

View this post on Instagram

Sunday blues 🎶

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

View this post on Instagram

It’s time to get FARAAR !!!

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like