Coronavirus : अभिनेता कार्तिक आर्यननं PM-Cares फंडात दान केली ‘मोठी’ रक्कम, म्हणाला – ‘जे कमावलं ते देशाचं’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन यानं कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत मदतीचा हात दिला आहे. कार्तिकनं पीएम केअर्स फंडात 1 कोटी रुपये डोनेट केले आहेत. याआधीही अक्षय कुमार, प्रोड्युसर भूषण कुमार, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांसारख्या कलाकारांनी पैसे डोनेट केले आहेत. अभिनेता अक्षय कुमारनं या फंडात 25 कोटी रुपये डोनेट केले आहेत.

कार्तिकनं काही वेळापूर्वीच सोशलवर एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये कार्तिक म्हणतो, “आपण सारे देशासाठी एकत्र उभं रहावं ही सध्या सुरू असलेल्या वेळेची मागणी आहे. जे पैसे मी कमावले आहेत ते भारत देशातील जनतेमुळंच कमावले आहेत. त्यामुळं मी आपल्यासाठी पीएम मोदी केअर्स फंडात 1 कोटी रुपये डोनेट करत आहे. मी सर्व देशवासियांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त पैसे या फंडात दान करावेत.” असंही त्यांनी लिहिलं.

कार्तिक आर्यनसोबत पती पत्नी और वो या सिनेमात दिसलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनंही या फंडात 30 लाख रुपये डोनेट केले आहेत. अद्याप अनुष्का शर्मा, करण जोहर, कपिल शर्मा, वरुण धवन, अक्षय कुमार, गुरू रंधवा, आयुष्मान खुराना यांसारख्या कलाकारांनी पैसे डोनेट केले आहेत. अनुष्कान शर्मानं किती पैसे डोनेट केले याची घोषणा मात्र केलेली नाही.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो भूल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय कार्तिक दोस्ताना 2 या सिनेमातही झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत असणार आहे.