Coronavirus : अभिनेते परेश राव यांचा तबलिगी जमातच्या ‘त्या’ सदस्यांना एकच ‘बाणेदार’ प्रश्न

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात सुरू असणारा लॉकडाऊन उद्या(मंगळवार दि 14 एप्रिल 2020) संपणार होता. परंतु देशातली स्थिती पाहता आता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या सगळ्यावर आता अभिनेते आणि नेते परेश रावल यांनी भाष्य केलं आहे. पोलिसांची कठोर कारवाई तसेच तबलिगी जमात यावरही त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.

परेश रावल यांनी लॉकडाऊनचं समर्थन केलं आहे. ल़ॉकडाऊन आणि पोलिसांच्या कठोर कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, “नोव्हल कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये ज्या पद्धतीनं वाढ होत आहे ते पाहता ही काळाची गरज आहे. हे सर्वांच्याच हिताचं आहे. पोलिसांनाही कठोर कारवाई करताना चांगलं वाटत नाही. परंतु लोकांना परिस्थितीचं गांभीर्यच जर कळणार नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी.”

तबलिगी जमातीवर भाष्य करताना परेश रावल म्हणाले, “ही केवळ कोणत्या एका धर्माची गोष्ट नाही. मिनिटा मिनिटाला बातम्या आल्या आहेत. यासंदर्भात लोकांना सर्वकाही माहिती आहे. थुंकणे, उघड्याव विष्ठा करणे हे सर्वांना माहिती आहे. कोणीही हे नाकारू शकत नाही.”

पुढे बोलताना रावल म्हणाले, “मला वाटतं ज्यानं आणि जिथं उल्लंघन केलं आहे त्याला प्रश्न विचारला जायलाच हवा. आपल्या देशात आत्महत्यादेखील गुन्हा आहे. त्यामुळं जर आपण दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकत असू तर त्यावर प्रश्न विचारला नको का ?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.”