Coronavirus : अभिनेता रितेश देशमुख ‘कोरोना’ला म्हणाला, ‘इतना करो ना मुझे प्यार’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सध्या घरातच टाईम स्पेंड करणारे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रिय आहेत. चाहत्यांसाठी ते काही ना काही सोशलवरून शेअर करत असतात. अनेक स्टार्स चाहत्यांना घरात राहण्यासाठी आणि स्वच्छता ठेवण्यासाठी अपील करत असतात. रितेश देशमुख यांनंहा आज एक मजेदार व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तो साबणानं हात धुताना दिसत आहे. चाहत्यांचं मनोरंजन करत रितेशनं चाहत्यांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

रितेशनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो कोरोनाच्या भीतीनं साबणानं हात धुताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना रितेशनं मजेदार कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये रितेश म्हणतो, “इतना करो ना मुझे प्यार”

सेफ हँड्स चॅलेंज अंतर्गत अनेक बॉलिवूड स्टार्स सध्या अशा प्रकारे हात धुण्याचा व्हिडीओ शेअर करत स्वच्छतेचा संदेश देत आहेत. याआधी प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोण, शिल्पा शेट्टी आणि अनुष्का शर्मासहित अनेक कलाकारांनी आपले असे व्हिडीओ सोशलवर शेअर केले आहेत.

रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तो बागी 3 या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्या सोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. 6 मार्च 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसला परंतु कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं थिएटर बंद करण्यात आले आणि सिनेमाच्या कमाईला मध्येच ब्रेक लागला.