Coronavirus : ‘कोरोना’चा कहर सुरु असतानाच अभिनेता शक्ती कपूरनं शेअर केला ‘इमोशनल’ व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाईन  :जगभरात हजारोंच्या संख्येनं लोक कोरोनामुळं मरत आहे. बाधितांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात बॉलिवूड स्टार शक्ती कपूरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं तो चर्चेत आला आहे. यात शक्ती कपूर रडताना दिसत आहे. त्यानं लोकाना जीवनाची कदर करायला आणि देवाचे आभार मानायला सांगितलं आहे.

शक्ती कपूर व्हिडीओत म्हणत आहे की, “इटलीत एक 93 वर्षीय वृद्ध नीट होऊन परत चालला होता. तेव्हा डॉक्टर म्हणाले की, तुम्हाला एका दिवसाच्या व्हेंटीलेटरचं बिल द्यावं लागेल. बिल आहे 5000 रुपये. यानंतर त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर म्हणाले तुमच्याकडे पैसे नाहीत का ? यावर तो म्हातारा म्हणाला की, पैसे तर खूप आहेत परंतु मला आज हे कळाळं की, देवांच मला किती मोठं बिल द्यायचं आहे ज्यानं आयुष्यभर मला फ्रीमध्ये श्वास पुरवले. आज मला श्वास घेण्याचेही पैसे द्यावे लागत आहेत.”

पुढे बोलताना शक्ती कपूर म्हणतो, “ही गोष्ट माझ्या मनात खोल रुतली आहे. आपण कधी विचारलच केला नव्हता. जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा विचार करतो. त्यामुळं काळजी घ्या घरातच रहा. आपल्या जीवनाची किंमत समजून घ्या.”

शक्तीचा हा व्हिडीओ सध्या सोशळवर व्हायरल होताना दिसत आहे. कोरोनाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 12 तासात कोरोनाची नवीन 240 प्रकरणं समोर आली आहेत. देशातील बाधितांचा आकडाही 1400 हून अधिक झाला आहे. 133 लोक आतापर्यंत ठिक झाले आहेत. अद्याप 38 लोकांचा मृत्यू झाला आहे.