Coronavirus : अभिनेता वरुण धवननं तयार केलं ‘रॅप साँग’, म्हणाला – ‘जनता कर्फ्यु रॉक्स’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हायरमुळं देशात लॉकडाऊन लागू झाला असून पूर्ण देशात सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. अनेक कलाकार आपापल्या पद्धतीनं लोकांना जागरूक करण्याचं काम करत आहेत. काही दिवसांपर्वीच अभिनेता कार्तिक आर्यननं कोरोनाबद्दल एक मोनोलॉग शेअर केला होता आणि लोकांना घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं होतं. आता अभिनेता वरुण धवननंही यावर रॅप साँग तयार केलं आहे.

वरूण धवननं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यान लोकांना सांगितलं आहे की, घरात राहणं कसं फायदेशीर आहे. जनता कर्फ्युमुळं सर्वांना कसा फायदा होणार आहे हेही त्यानं सांगितलं आहे. व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करताना दिसत आहेत. वरूणनं व्हिडीओ शेअर करताना खास कॅप्शनही दिलं आहे. वरुण म्हणतो, “घरी रहा. सुरक्षित रहा.”

वरुणचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. वरूणचा रॅपवाला व्हिडीओ करण जोहर आणि वरुणच्या मित्रांनीही शेअर केला आहे.

देशभरात 900 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या महामारीमुळं 21 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकला आहे. लवकरच वरुण पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like