Coronavirus : चेकअपसाठी हॉटेलवर नेलेल्या अभिनेत्री कुनिका सदानंदचे ‘BMC’वर गंभीर आरोप ! फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हणाली… (व्हिडीओ)

बॉलीवूडनामा ऑनलाइन –लॉकडाऊन आणि महाराष्ट्रात सतत वाढणारे कोरोनाचे केसेस पाहता आता अशी स्थिती निर्माण झाली आहे डॉक्टरांची खूप वाट पहावी लागत आहे. टीव्ही अॅक्ट्रेस कुनिका सदानंद हिनं एका मुलाखतीत सांगितलं की, तिनं मागील दौरा हा दिल्लीचा केला होता. आत बीएमसीची टीम तिला हॉटेलवर घेऊन गेली आहे. त्यांनी काही लोकांना खूप वेळेपासून इथं ठेवलं आहे. बीएमसी टीमचं म्हणणं आहे की तिला डॉक्टरांच्या तपासणीनंतर घरी पाठवलं जाणार आहे.

कुनिका सदानंद हिनं सांगितलं की, ती डॉक्टरांची खूप वाट पहात आहे. वारंवार सांगूनही ती आता हॉटेलच्या रूमध्ये डॉक्टरांची वाट पहात आहे.

Locked up in a dingy hotel, since the past 8 hrs. No one has come to take our test, even though we were told by the BMC…

Geplaatst door Kunickaa Sadanand op Dinsdag 7 april 2020

कुनिका मुंबईच्या लोखंडवाला भागात रहाते. तिच्या घरून तिला 7 एप्रिल रोजी बीएमसीनं हॉटेल मिड टाऊन मध्ये आणलं आहे. हॉटेलमधील लोकांनी तब्बल 8 तास वाट पाहूनही डॉक्टरांनीच टीम इतं पोहोचू शकलेली नाही. तिनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर, हॉटेलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि आपलं म्हणणं मांडलं आहे.

कुनिका सांगते की, तिची तब्येत ठिक आहे परंतु फक्त टेस्ट करण्यासाठी ती डॉक्टरांची वाट पहात आहे. परंतु बीएमसीकडून कोणताही डॉक्टर अद्याप पोचू शकलेला नाही. हा बीएमसीचा निष्काळजीपणा आहे असं म्हणत तिनं फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.

You might also like