Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं वायुसैनिकांची ऑनलाइन परीक्षा लांबणीवर

मुंबई : वृत्तसंस्था – देशात कोरोना संसर्गाचा वाढत प्रभाव लक्षात घेत केंद्रीय वायुसैनिक भरती मंडळ (Central Airmen selection Board) ने वायुसैनिकांची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे बोर्डाच्या वतीने कळविण्यात आले.

हवाईदल जनसंपर्क विभागाने सांगितल्याप्रमाणे देशभरातील ८६ शहरात १९ तें ३ मार्च दरम्यान ही परीक्षा होणार होती. आता ही परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होईल, याबाबत अधिक माहितीसाठी www.airmenselection.cdac.in या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.

केंद्रीय वायुसैनिक मंडळ बोर्डाने परिपत्रकात असे म्हणले आहे की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर STAR 01/20 ऑटोमेटेड ई-परीक्षा अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आली असून, ही परीक्षा १९ ते २३ मार्च २०२० या दरम्यान होणार होती. मात्र अनेक राज्य सरकारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कलम १४४ लागू केले आहे. आता ही परीक्षा एप्रिल २०२० च्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते.