Coronavirus : अकलूज, अक्कलकोट, बोरामणी, पंढरपूरातही ‘कोरोना’चे रूग्ण, सोलापूर जिल्ह्यातील ‘कोरोना’बाधितांचा संख्या 667 वर

सोलापूर :  पोलीसनामा ऑनलाइन –  सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. सोलापूरमध्ये आज संध्याकाळी 9 वाजेपर्य़ंत 43 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सोलापूरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 667 वर पोहचली आहे. आतापर्यंत 311 रुग्ण बरे झाले आहेत. आज दिवसभरात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 66 इतकी झाली असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

आतापर्यंत 6698 जणांची कोरोना चाचणी झाली असून त्यापैकी 6160 अहवाल प्राप्त झाले आहेत. तर 538 अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालामध्ये 5493 निगेटिव्ह अहवाल आले आहेत तर 667 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात 270 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 227 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 43 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 24 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये दक्षिण बझार येथील 60 वर्षीय महिला, भवानी पेठेतील 75 वर्षीय पुरुष आणि महेश नगर जुना विडी घरकूल परिसरातील 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

आज जे रूग्ण मिळाले त्यांचे विभागपुढील प्रमाणे – अशोक चौक 1 पुरूष, 3 महिला. दत्तनगर पाच्छा पेठ 1 पुरूष, 3 महिला. मिलिंदनगर बुधवार पेठ 3 पुरूष. प्रियदर्शिनी सोसायटी 1 महिला. उत्तर कसबा 1 पुरूष. बोरामणी 1 पुरूष. सोलापूर जिल्हा कारागृह 1 पुरूष. कुमठा नाका 1 पुरूष. अवंतीनगर 1 पुरूष. कविता नगर पोलीस लाईन 1 पुरूष. नई जिंदगी 1 महिला. जुना विडी घरकुल 1 पुरूष, 3 महिला. विडी घरकुल 4 पुरूष. मराठावस्ती भवानी पेठ 1 पुरूष. पाच्छा पेठ 1 पुरूष. माधवनगर 1 पुरूष. गीता नगर न्यू पाच्छा पेठ 1 महिला. शिवपार्वतीनगर 1 पुरूष. न्यू बुधवार पेठ 1 महिला. कुमारस्वामीनगर शेळगी 1 महिला. अकलूज ता. माळशिरस 2 महिला. उपरी ता. पंढरपूर 1 महिला. गोपाळपूर पंढरपूर 1 महिला. ज्ञानेश्वरनगर पंढरपूर 1 पुरूष, 1 महिला. करकंभ ता. पंढरपूर 1 पुरूष. मधला मारूती अक्कलकोट 1 पुरूष. भारतगल्ली अक्कलकोट 1 पुरूष.