Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात 133 जण झाले बरे

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन  –   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 39 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 36 अहवाल निगेटीव्ह तर तीन अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7820(6343+1322+155) झाली आहे. आज दिवसभरात 133 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 40490 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 39461 फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 821 नमुने होते. आजपर्यंत एकूण 40448 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34105 तर पॉझिटीव्ह अहवाल 7820(6343+1322+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज तीन पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जीएमसी, गीतानगर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

133 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 13 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून चार जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जण, कोविड केअर सेंटर हेंडज मुर्तिजापूर येथून 62 जण, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून तीन जण, कोविड केअर सेंटर अकोट येथून दोन जण, कोविड केअर सेंटर बार्शिटाकळी येथून दोन जण, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून दोन जण, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा 39 जणांना अशा एकूण 133 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण उमरा पांगरा ता. पातूर येथील 59 वर्षीय पुरुष असून ते 9 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

384 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7820(6343+1322+155) आहे. त्यातील 256 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7180 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 384 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.