Coronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षयनं दान केले 25 कोटी !

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हायरसनं साऱ्या दुनियेत हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत यामुळं 22 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सध्या कोरोनाग्रस्तांची मदत करण्यासाठी बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक कलाकार पुढे येताना दिसत आहेत. पीएम मोदींनी लोकांना आपलं योगदान देण्याचं अपील केलं आहे. त्यांनी सांगितलं की, ज्या लोकांना मदत करण्याची इच्छा आहे ते PM Cares Fund मध्ये पैसे डोनेट करू शकतात.

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्यानं तब्बल 25 कोटी रुपये दान केले आहेत. PM मोदींचं ट्विट रिट्विट करत त्यानं याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये अक्षय कुमार म्हणतो, “हा तो काळ आहे ज्यात सध्याला फक्त आपल्या लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. आपण यासाठी जे काही करू शकतो ते करायला हवं. माझ्या बचतीमधून मी पीएम मोदी केअर्स फंडमध्ये 25 कोटी दान करण्याची शपथ घेतो. आयुष्य वाचवूया. जान है तो जहां है” असंही तो म्हणाला आहे. ANI या वृत्तसंस्थेनंही याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like