Coronavirus : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, CM ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार; मोठा निर्णय घेणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे असे वाटत असताना राज्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात खासकरुन विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यानंतर आता पुणे आणि मुंबईमध्ये (Pune and Mumbai) देखील कोरोना रुग्णांची (Coronavirus Patients) संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनासह राज्य सरकारने (State Government) उपाययोजनांना सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज राज्यातील जनतेशी संवाद (Address the people) साधणार आहेत.

राज्यात (Maharashtra) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला मार्गदर्शन करुन धीर देण्याचे काम केले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सुरुवातीपासूनच जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यास प्रशासनाला यश आले. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह पुणे, मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

त्यादरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी सायंकाळी सात वाजता संवाद साधणार आहेत. यावेळी ते राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती राज्यातील जनतेला देणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री कोरोनाला रोखण्यासाठी कोणती मोठी घोषणा करतात, तसेच कोरोना रोखण्यासाठी कोणती नवी नियमावली जाहीर करतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.