Coronavirus : चुकूनही ‘कोरोना’च्या नव्या स्ट्रेनच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या किती आहे धोका !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ब्रिटनमध्ये पसरलेला नवा स्ट्रेन डेनमार्क, नेदरलॅंड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, जपाननंतर आता भारतातही आला आहे. परंतु, जिथे लोकांना कोविड-१९ वॅक्सीन आल्यानं थोडा धीर मिळाला होता, पण आता त्यांचं टेंशन कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे वाढलं आहे. जगभरातील वैज्ञानिक आणि चिकित्सक नव्या स्ट्रेनचा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत अजून बरीच माहिती मिळणं बाकी आहे. कोरोना व्हायरसची भिती अजून दूर झालेली नाही. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये अधिक तणाव वाढत आहे.

येणाऱ्या दिवसांमध्ये नव्या प्रकारचा कोरोना एक गंभीर धोका निर्माण करू शकतो. नवीन स्ट्रेनच्या लक्षणांचा विषय (म्यूटेंट व्हेरिएंट) येतो तेव्हा सेंटर फॉर डिजीज कंट्रोल ॲन्ड प्रिवेंशनने लोकांना यापासून बचावासाठी लगेच डॉक्टरांना संपर्क करणे. आणि याकडे अजिबात दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे.

जेव्हा पहिल्यांदा कोरोना व्हायरसची माहिती समोर आली होती तेव्हा त्याची वेगवेगळी लक्षणं समोर येणार आहेत. या व्हायरसबाबत वैज्ञानिकांनाही रोज नवीन गोष्टी समजतात. कोरोनाची काही मुख्य लक्षणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत. त्यात ताप, कोरडा खोकला, घशात खवखव, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, थकवा, पोटासंबंधी संक्रमण, चव किंवा गंध न समजणे इत्यादींचा समावेश होतो.

जाणून घ्या नवा कोविड स्ट्रेन ?
तज्ज्ञांनुसार, नव्या कोविड स्ट्रेनमध्ये स्पाइक एक आनुवांशिक परिवर्तन आहे. जो लोकांच्या शरीरात सहजपणे आणि वेगाने पसरत आहे. स्पाइक प्रोटीनच्या मदतीने कोरोना व्हायरस मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि सेल्स आपल्या ताब्यात घेतो. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये १७ वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन असण्याची बाब समोर आली आहे. या म्युटेशनमध्ये स्पाइक प्रोटीनही आहे जे कोरोना व्हायरस फॅमिलीला त्याचं नाव देतो. नव्या कोरोना व्हायरस व्हेरिेएंटला VUI 202012/01 असं नाव देण्यात आलं आहे. नव्या प्रकारचा कोरोना व्हायरसमध्ये स्पाइक प्रोटीन असल्याची बाब समोर आली आहे.

नव्या व्हायरसची लक्षणे
नव्या कोरोना व्हेरिएंटची लक्षणेही ओरिजीनल कोविड १९ च्या समान आहेत. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल ॲन्ड प्रिवेंशनने कोविड १९ ची नवीन स्ट्रेनची ५ गंभीर लक्षणे सांगितली आहेत. यावर प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्हालाही ही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नव्या कोरोना व्हेरिएंटबाबत नुकताच लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅन्ड ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये एक रिसर्च करण्यात आला. त्यात अशी माहिती आहे की, नवा कोविड स्ट्रेन लंडनमधील मृतांचा आकडा वाढवू शकतो. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये पसरणाऱ्या म्युटेशनने रुग्णांची संख्या अधिक वाढेल. या नव्या स्ट्रेनचा धोका लहान मुलांना सुद्धा आहे.

– श्वास घेण्यास त्रास होणे

– भ्रम झाल्यासारखं वाटणे

– सतत छातीत दुखणे

– थकवा जाणवणे

– चेहरा आणि ओठ निळे पडणे