Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरस WHO कडून ‘महामारी’ (साथीचा रोग) म्हणून ‘घोषित’, भारत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीन, इराण आणि इटलीमध्ये महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेने माहामारी घोषित केली आहे. भारताने कोरोना व्हायरसमुळे परदेशातून येणार्‍यांचा वीजा 15 एप्रिलपर्यंत सस्पेन्ड केला आहे. या प्रतिबंधातून विशेष व्यक्ती, अधिकारी, सयुंक्त राष्ट्र संघ आणि अंतरराष्ट्रीय संघटनांचे कर्मचारी यांना सूट मिळणार आहे. हा प्रतिबंध 13 मार्च 2020 पासून होणार आहे.

सरकारने हे सुद्धा सांगितले की, भारतीय नागरिकांना सल्ला दिला जात आहे की, जरूरी नसताना परदेश प्रवास करू नये. जर ते कुठून प्रवास करून परतत असतील तर त्यांना किमान 14 दिवसांपर्यंत इतर लोकांपासून वेगळे ठेवले जाऊ शकते.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, आमच्या माहितीनुसार कोविड – 19 आता महामारी झाला आहे. संपूर्ण जगात पसरत असलेल्या या व्हायरसमुळे आम्ही चिंताग्रस्त आहोत. हा आता भयंकर पातळीवर पोहोचला आहे.

सरकारकडून सांगण्यात आले आहे की, ज्या परदेशी नागरिकाला भारतात यायचे आहे, त्यांनी प्रथम भारतीय दूतावासाशी संपर्क करावा. सर्व भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिकांना सूचना आहे की, जर खुप आवश्यक नसेल तर अनावश्यक प्रवास करू नये. जर तुम्ही भारतात येत असाल तर तुम्हाला 14 दिवस देखरेखीखाली वेगळे ठेवले जाऊ शकते.

भारतात कोरोना व्हायरसच्या 60 पॉझिटीव्ह केस

कोरोना व्हायरसने भारताला सुद्धा वेढा घातला आहे. कोविड-19 च्या संसर्गाचे 60 रूग्ण भारतातसुद्धा आहेत. कोरोना व्हायरसवर आरोग्य मंत्रालयसुद्धा अलर्ट मोडवर आहे. आरोग्य मंत्रालयात लागोपाठ बैठका होत आहेत. कोरोना व्हायरसवर निर्माण भवनमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. बुधवारी झालेल्या या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, हरदीप सिंह पुरी, नित्यानंद राय, अश्विनी चौबे यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन होते. याबैठकीत वरील निर्णय घेण्यात आले आहेत.

14 दिवस देखरेखीखाली राहतील परदेशी प्रवासी

चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये जे भारतीय किंवा परदेशी प्रवाशी 15 फेब्रुवारी पर्यंत राहिले असतील, त्यांना भारतात आल्यानंतर किमान 14 दिवस वेगळे ठेवून वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले जाईल. 13 मार्चनंतर ही व्यवस्था लागू होणार आहे.

जमीनीवरील सीमांवरही प्रतिबंध लागू

भारत सरकारकडून जारी आदेशानुसार अंतरराष्ट्रीय सीमांवरून होणार्‍या प्रवासावर चेकपोस्टवरून लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक चेक पोस्टवर स्क्रीनिंग केली जाईल. त्यांना गृह मंत्रालयाकडून नोटिफाय केले जाईल.

काय सांगतात जागतिक आरोग्य संघटनेचे आकडे

जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोविड-19 व्हायरस खुप वेगाने पसरत आहे. प्रभावित देशांमध्ये याची संख्या 3 पटीने वाढत आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची एकुण 118,000 प्रकरणे समोर आली आहेत. 114 देशात कोरोना व्हायरस पसरला आहे. या व्हायरसमुळे 4,291 लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक रूग्णालयांमध्ये मृत्यूशी झूंज देत आहेत. कोरोना व्हायरस महामारीला कोणत्याही देशाने सहजपणे घेऊ नये. हा आजार अतिशय भयंकर स्तरावर पोहचला आहे. यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.