Coronavirus Impact : कोरोनामुळं पुण्यातील बाजारपेठ आगामी 3 दिवसांसाठी बंद ! व्यापारी महासंघाच्या बैठकीतील निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे व्यापारी महासंघातर्फे आगामी 3 दिवस म्हणजेच दि. 17,18 आणि 19 मार्च 2020 रोजी घाऊक व किरकोळ व्यापार स्वंयस्फूर्तीनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुण्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये झाला आहे. हा निर्णय कोरोना व्हारसच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून पुणेकरांच्या हितांकरिता घेण्यात आला आहे.

pune

बंदमधून जीवनावश्यक वस्तू व औषधांच्या दुकानांना वगळण्यात आले आहे. पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय गुरूवार दि. 19 मार्च च्या बैठकीत घेण्याचे ठरले आहे. आज झालेल्या बैठकीत सराफ, होजिअरी व कापड, ऑटोमोबाईल, प्लायवूड, टिंबर स्टेनलेस स्टील, नॉन फेरस मेटल, पेपर, प्लॉस्टिक, इलेक्ट्रिक अ‍ॅन्ड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी व वेल्डींग, कॉम्प्युटर, टॉईज, वॉच, सायकल-कर्वे रोड, केमिकल, रविवार पेठ व्यापारी यांच्यासह इत्यादी व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, वरिष्ठ उपाध्यक्ष सुर्यकांत पाठक, उपाध्यक्ष रतन किराड, सचिव महेंद्र पितळीया, सह सचिव हेमंत शहा, सह सचिव जयंत शेटे आणि खजिनदार मनोज सारडा, मोहन पटेल, दिपक शहा, शांतीलाल ओसवाल, नितीन काकडे, बॉबी माईनी, रवि जसनानी, सुरेश जेठवानी, प्रसाद देशपांडे, उमेश झंवर, मंगेश भालेराव, बक्षीसिंग तलवार, अभय गाडगीळ, सुरेश पोळेकर, प्रमोद चव्हाण यांच्यासह इतर व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.