Coronavirus : पुणे महापालिका हद्दीतील सर्व शाळा बंदच राहणार – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा पार्श्वभुमीवर पुणे शहरातील आणि पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वच शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

13 डिसेंबर रोजी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निरर्णय घेण्यात येणार आहे. पालकांशी चर्चा करून आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.