‘कोरोना’चा कहर ! चीननं भारतीय विमान रोखलं, मात्र ‘या’ देशांना दिली परवानगी, आतापर्यंत 2345 मृत्युमुखी

बिजिंग : वृत्त संस्था – भारताप्रमाणेच जपान, यूक्रेन आणि फ्रान्सला वुहानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढायचे आहे. चीनने त्यांच्या विमानांना येण्याची परवानगी दिली, परंतु भारताला अजूनही परवानगीची वाट पहावी लागत आहे. भारताने आरोप केला आहे की, कोरोनाची लागण झालेल्या लोकांना मदतीचे साहित्य घेऊन जाण्यासाठी आणि तेथील भारतीयांना परत आणण्यासाठी लष्करी विमान सी-17 पाठवण्याच्या प्रस्तावाला चीन जाणीवपूर्वक मंजूरी देण्यास उशीर करत आहे.

भारताने 20 फेब्रुवारीला विमान वुहानला पाठवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु क्लियरन्स न मिळाल्याने विमानाला उड्डाण घेता आले नाही. भारताच्या या आरोपानंतर दिल्लीतील चीनी दुतावासाचे प्रवक्ते जी रोंग यांनी म्हटले की, भारतीय विमानाला जाऊ देण्यास जाणीवपूर्वक उशीर केला जात नाही. हुबेई प्रांतात महामारी गंभीर आहे. तेथील स्थिती खराब आहे. दोन्ही देशांचे विभाग सतत संपर्कात आहेत. जाणीवपूर्वक मंजूरी दिली जात नसल्याचा आरोप चुकीचा आहे. वुहान कोरोनाचे सर्वात प्रभावित चीनी शहर आहे. तेथे अजूनही 100 पेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत.

आमिर खानचे चाहत्यांना आवाहन

बॉलीवुड अभिनेता आमिर खानने आपल्या चीनी चाहत्यांना कोरोनाबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अमिरने म्हटले आहे की, चीनमधील माझ्या मित्रांना नमस्कार, जेव्हापासून मी कोरोना व्हायरसबाबत ऐकले, तेव्हापासून चिंतेत आहे. तुम्ही काळजी घ्या आणि सरकारी निर्देशांचे पालन करा.

चीनमध्ये मृतांची संख्या 2345 वर पोहचली आहे. या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 76,288 झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तज्ज्ञांचे एक पथक शनिवारी वुहानमध्ये पोहचले आहे. तर दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची 142 नवी प्रकरणे समोर आली आहेत.

चीननंतर येथे सर्वात जास्त 346 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इराणमध्ये आणखी एका व्यक्तीच्या मृत्यूसह मृतांची संख्या 5 झाली आहे. येथे संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 28 झाली आहे. संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्ये संसर्ग झालेल्या लोकांची संख्या वाढून 11 झाली आहे.

इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे दुसरे प्रकरण समोर आले आहे. 15 हजारपेक्षा जास्त लोक अगोदरच यामुळे संक्रमित आहेत. तर, जपानी क्रूज जहाजावरून अमेरिकेत परतलेल्या 18 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. ही संख्या वाढून 35 झाली आहे.

इराणमध्ये 6 मृत्युमुखी
इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे कोरोना व्हायरसची लागण झालेली आणखी एक व्यक्ती सापडली आहे. या घातक विषाणुने मरणार्‍यांची संख्या वाढून आता सहा झाली आहे.

मरकाजी प्रांताचे गव्हर्नर यांनी अधिकृतपणे सांगितले की, अराकमध्ये सध्या एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या नमुण्यांच्या तपासणीनंतर त्यास कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तो हृदयाच्या आजाराने सुद्धा ग्रस्त होता. इराणमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची आतापर्यंत एकुण 28 प्रकरणे समोर आली आहे.

You might also like