धक्कादायक ! ‘कोरोना’ रूग्णाला हॉस्पीटलनं पाठवलं 181 पेजस्चं बिल, म्हणाले – ‘8.5 कोटी रूपये करावं लागेल पेमेंट’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या रोगाबद्दल अमेरिकेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाने एका रुग्णाला 181 पानांचे बिले दिले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या या रुग्णाला तब्बल 11 कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिकचे बिल पाठवले गेले आहे. जे साडे आठ कोटींपेक्षा जास्त आहे. बिलाची रक्कम पाहून सर्वांना धक्का बसला.

या रुग्णीची मुलाखत सध्या स्थानिक वृत्तवाहीनीवरून प्रसारित केली जात आहे. एका वृत्तवाहिनिने दिलेल्या वृत्तानुसार, मायकेल फ्लॉरला 4 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली होती. त्यानंतर त्याला 62 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका अहवालानुसार, एक वेळ अशी आली होती की मायकल फ्लॉर वाचू शकणार नाही. अशा परिस्थितीत एक नर्स त्याचे पत्नी व मुलेसोबत बोलणे करून देत होती. जेणेकरून मायकेल आपल्या नातेवाईकांसोबत शेवटेचे बोलू शकेल.

त्यानंतर फ्लोअरच्या तब्येतीत अनपेक्षीतपणे सुधारणा झाली. तो वेगाने बरा होऊ लागला आणि 5 मे रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्याने वृत्तवाहिनिला सांगितले की, रुग्णालयाने त्याला 181 पानांचे बिल पाठवले आहे. ज्यामध्ये 1,122,501.04 अमेरिकी डॉलर म्हणजेच 8,52,61,811.50 रुपयांचे बिल होते. यामध्ये आयसीयू साठी दररोज 9,736 डॉलर म्हणजे 7,39,517.35 रुपये बिल आकारण्यात आले होते. 42 दिवसांच्या स्टेरायल रुमसाठी 4,09,000 अमेरिकी डॉलर म्हणजेच 31,06,64.13 रुपये बिल आकारण्यात आले. 29 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते त्यासाठी रुग्णालयाने 82,000 डॉलर म्हणजे 62,28,474 रुपये बिल आकारण्यात आले. जेव्हा तो मृत्यूशी झगडत होता. त्या दोन दिवसांचे जवळपास एक लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच 75,95,700 रुपये आकारण्यात आले.

वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, प्लोरच्या वयामुळे तो सरकारी विम्याचा हक्कदरा आहे आणि हे पैसे त्याच्याकडून हॉस्पिटलने घेऊ नयेत. फ्लोर म्हणाला, मला चांगलेच ठाऊक आहे की माझे जीव वाचवण्यासाठी लाखो रुपये लागले आहेत.