Coronavirus : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम ठरतो आवळा अन् पुदीन्याचा खास ज्यूस ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जर इम्युनिटी पावर कमजोर असेल तर वातावरणातील बदलामुळं फ्लू, कोल्ड, सर्दी, खोकला अशा अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय इम्युनिटी पावर कमजोर असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागणही लवकर होत असते. यासाठी आपण एक खास उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळं तुमची इम्युनिटी पावर वाढेल.

यासाठी आपण खास प्रकरच्या ज्यूसबद्दल माहिती घेणार आहोत ज्याच्या सेवनानं तुम्हाला व्हिटॅमिन सी सोबत इतरही पोषक घटक मिळतील.

साहित्य –

1) आवळा

2) आलं

3) पुदीन्याची पानं

4) धन्याची पानं

वरील सर्व सामग्री एकत्र करून तुम्हाला ज्यूस तयार करून त्याचं सेवन करायचं आहे. यामुळं तुमची इम्युनिटी पावर आणखी मजबूत होईल.

भरपूर प्रमाणात मिळणार व्हिटॅमिन सी

धन्यात आणि पुदीन्याच्या पानात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. पुदीन्यात अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात यामुळं सर्दी खोकला झाल्यानंतर होणारी जळजळ दूर होते. धन्यातही अँटी ऑक्सिडंट्स असतात. यात डिटॉक्सिफाईंग, अँटी बॅक्टेरियल आणि इम्युनिटी वाढवणारे गुण असतात.

आवळा आणि आलं

नियमितपणे जर आवळ्याचं सेवन केलं तर शरीरात पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढते. यामुळं शरीराला संक्रमण आणि आजारांसोबत लढण्याची ताकद मिळते. आवळ्यात भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असतं. आल्यात जिंजरोल असतं. जिंजरोलमध्ये एनाल्जेसिक, सेडविक, अँटीपायरेटीक, अँटी बॅक्टेरियल गुण असतात. यामुळं शरीराची इम्युनिटी वापर वाढते. सर्दी खोकल्यासोबत ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठीही आल्याचं सेवन बेस्ट मानलं जातं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.