Coronavirus : नैसर्गिकरित्या हर्ड इम्युनिटी मिळविणे अशक्य – संशोधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   हर्ड इम्युनिटी संदर्भात माहिती गोळा करण्यासाठी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूवर मोठा अभ्यास केला आहे. अभ्यासाचे निकाल आश्चर्यकारक आहेत. दरम्यान हर्ड इम्युनिटी अश्या स्थितीला म्हंटले जाते, जेव्हा एखाद्या समाजात इतके अधिक लोक इम्यून झाले आहेत की व्हायरसची साखळी तुटली आहे आणि नवीन लोका संक्रमित होत नाही. स्पेन हा केवळ 4.6 कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. येथे 2.98 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 28 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यूही झाला आहे. या कारणांमुळे असे म्हंटले जाते की, स्पेनमधील बरेच लोक इम्यून झाले असतील. परंतु या अभ्यासात असे दिसून आले आहे की, आतापर्यंत स्पेनमधील केवळ 5 टक्के लोकच इम्यून झाले आहेत.

अहवालानुसार स्पेनमध्ये झालेल्या अभ्यासानंतर हर्ड इम्युनीटीबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत आणि म्हटले जात आहे की, लसीशिवाय हर्ड इम्युनिटी प्राप्त होणार नाही. लँसेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार हा अभ्यास खूप मोठा होता आणि सुमारे 61 हजार लोकांचे नमुने घेण्यात आले होते. नवीन अभ्यासाचा अर्थ असा आहे की, 28 हजार लोक गमावल्यानंतरही अद्यापही स्पेनच्या लोकसंख्येच्या 95 टक्के लोकांवर विषाणूचा धोका आहे. युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार हा युरोपमधील कोणत्याही देशात केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा अभ्यास आहे.

लॅन्सेटच्या अभ्यासात जिनेव्हाच्या सेंटर फॉर इमर्जिंग व्हायरल डिजीजच्या प्रमुख इजबेल एकर्ले आणि जिनिव्हा विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ बेंजामिन मेयर यांनी सांगितले की, परिणामातून दिसून आले की, हर्ड इम्युनिटी मिळवणे केवळ अनैतिकच नव्हे तर अशक्य आहे. दरम्यान, डॉक्टरांना अद्यापही खात्री पटली नाही की एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनासाठी अँटीबॉडी असल्यास, त्याला पुन्हा संसर्ग होणार नाही किंवा किती दिवस सुरक्षित राहील. त्याच वेळी, तज्ञ म्हणतात की, समाजातील 60 टक्के लोकांना हर्ड इम्यूनिटीसाठी सामान्य परिस्थितीत रोगप्रतिकारक असणे आवश्यक आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like