Coronavirus : ‘तुम्ही फक्त गोमूत्र प्या आणि थाळ्या वाजवा’, अनुराग कश्यपचा भाजपाच्या आयटी सेल प्रमुखांवर ‘निशाणा’

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता अनुरागने थेट भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही गोमूत्र प्या आणि थाळ्या वाजवा असा खोचक सल्ला मालवीय यांच्या ट्विटवर दिला आहे. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक असणारा अनुराग कश्यप सोशल मिडियावर प्रंचड अक्टीव्ह आहे. अनेकदा तो सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर सोशल मिडियावर मुक्तपणे आपली मते मांडतात. अनुरागने याआधी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशमधील बरेली येथील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. यामध्ये दिल्ली, हरियाणा, नोएडा येथून आलेल्या शेकडो कामगार, महिला आणि लहान मुलांना जमीनीवर बसवून त्यांवर सिटायझर सोल्युशन फवारण्यात आले होते. या व्हिडिओवरुन बराच वाद झाला. अनेकांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर टीका केली. भाजपाची सत्ता असणार्‍या उत्तर प्रदेश सरकारवर टीका करण्यात आल्यानंतर मालवीय यांनी एक दुसरा व्हिडिओ ट्विट केला. हा केरळचा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये दुसर्‍या राज्यातून आलेल्य लोकांवर फवारणी केली जात असल्याचे दिसत आहे. मात्र लोकांना उत्तर प्रदेशमधील घटनेचा राग येत आहे, का तर तेथे भगवाधारी संत राज्यातील लोकांचे भले करण्यासाठी काम करत आहे, असे कॅप्शन या व्हिडिओला मालवीय यांनी दिली आहे.

मालवीय यांच्या या ट्विटवरुन अनुरागने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अनुरागने मालवीय यांना दिलेल्या उत्तरमध्ये, हा बघा परत आला खोटे बोलणार्‍यांचा मोहरक्या. या व्हिडिओतील फवारणी आणि बरेलीमधील फवारणीमध्ये बरेच अंतर आहे. तुमच्या गोबर बुद्धीला हा फरक कळणार नाही. तुम्ही गोमूत्र प्या आणि थाळ्या वाजवा, असा टोला लगावला आहे. त्यानंतर अनुरागने आणखीन एक ट्विट करत दोन्ही प्रकारच्या फवारणीमध्ये काय फरक आहे हे सांगितलं. बरेलीमध्ये लोकांवर फवारण्यात आलेल्या सॅनिटायझर सोल्युशनमध्ये मानवी शरिराला घातक ठरणारं सोडियम हायपोक्लोराइट होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like