Coronavirus : चिंताजनक ! भारतात ‘कोरोना’ व्हायरसनं केलं रूपांतर, आणखी वेगळी लक्षणे आली समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज ९० हजारांच्यावरती रुग्ण आढळून येत असल्याने भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. अशातच कोरोना संसर्गा बाबत चिंता वाढवणारी माहिती उघडकीस आली आहे. भारतात कोरोना संसर्गाने आपल्यात बदल केला असून, आता कोरोनाच्या रुग्णांत डेंग्यूप्रमाणेच प्लेटलेट्स कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

डेंग्यू झाल्यास ताप आल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्याचं आपण पाहिलं आहे. पण आता हे लक्षण कोरोना संसर्गित रुग्णांमध्ये आढळू लागलं असून, त्यांच्या प्लेटलेट्स अचानक २० हजारांहून कमी होत असल्याचं निदर्शनास येत आहे. मात्र, संबंधित रुग्णाची डेंग्यू चाचणी केली असता त्यामध्ये संबंधित रुग्णास डेंग्यू ची बाधा झालं नसल्याचे समोर येत आहे. तसेच हे रुग्ण आजार गंभीर स्वरुपात पोहचल्यावर सापडत आहेत.

यासदंर्भात पीजीआयचे प्राध्यापक अनुपान वर्मा म्हणाले, रुग्णांच्या प्लेटलेट्स मध्ये अचानक मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने अशा रुग्णाची परिस्थिती स्थिर राखणे कठीण झाले आहे. लोकबंधू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एका डॉक्टरच्या प्लेटलेट्स दुसऱ्याच दिवशी दहा हजारांवर आल्या. कोरोना संसर्ग रुग्णांचा इम्यून कॉम्प्लेक्स बिघडवत असून, तो मोनोसाईड आणि मॅकरोफेज सेलवर हल्ला करत आहे. त्यात शरीरातील प्लेटलेट्सची गरज वाढत आहे. मात्र, त्याची शरीरातील निर्मिती आधीपेक्षा कमी होते. त्या रुग्णांना प्लेटलेट्स दिल्या जातात. तसेच गरज वाटल्यास प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात येतो.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची डेंग्यूची तपासणी करणे आवश्यक बनले आहे. त्यातल्या त्यात ज्या रुग्णांच्या प्लेटलेट्स काउंटमध्ये घट दाखवत आहे, अशांची चाचणी होणे आवश्यक आहे. त्यामाध्यमातून रुग्णाला डेंग्यूचे किंवा कोरोनाचे निदान झाले आहे याची माहिती मिळू शकेल. तसेच याबद्दल अधिक रिसर्च सुरु असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.