Coronavirus : ‘अ‍ॅंटीबायोटीक्स’मुळं बरा होऊ शकतो का कोरोना विषाणूचा रुग्ण ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग (Pandemic) जाहीर म्हणून केले आहे. या विषाणूने 120 हून अधिक देशांना घेरले आहे. हा प्राणघातक विषाणू टाळण्यासाठी लोक अनेक खबरदारी घेत आहेत. हा विषाणू रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही.

त्याच वेळी, काही लोकांना असे वाटते की, कोरोना विषाणूचा संसर्ग अँटीबायोटिक्सद्वारे रोखला जाऊ शकतो. सर्व प्रथम, शरीरात अँटीबायोटिक्स काय कार्य करतात ते जाणून घ्या. अँटीबायोटिक्स विषाणूला नव्हे तर केवळ बॅक्टेरियाला नष्ट करतात. व्हायरस आणि बॅक्टेरिया या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्ही शरीराला वेगळ्या प्रकारे नुकसान पोहचवतात.

अँटीबायोटिक्स हा विषाणूला नष्ट करू शकत नाही आणि कोविड-19 हा एक व्हायरस आहे, म्हणून त्यावर अँटीबायोटिक्सने उपचार केला जाऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, अँटीबायोटिक्सचा वापर कोराणा विषाणूपासून बचाव करण्यासाठी करू नये. बॅक्टेरियाच्या संसर्गासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे घ्यावे.

जर एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असेल तर त्याला बॅक्टेरियाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी अँटीबायोटिक्स दिले जाऊ शकते.

कसे ठेवाल स्वतःला सुरक्षित?
थोड्या-थोड्यावेळाने कमीतकमी 20 सेकंद साबणाने हात धुणे गरजेचे आहे. जर तुम्ही हात धुवू शकत नसाल तर 60 टक्के अल्कोहोल असणारे बेस्ट सॅनिटायजरने आपले हात स्वच्छ करावे.

सर्दी आणि तापाची लक्षणे दिसणार्‍या कोणत्याही व्यक्तीपासून दूर रहा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जर तुम्हाला मांसाहारी जेवण करायचे असेल तर ते पुर्ण स्वच्छ करून शिजवावे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणतेही औषध घेऊ नका. हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. फक्त घरातील ताजे पदार्थ खा.