सचिन तेंडुलकरची बॅट बनवणारे अशरफ चाचा Corona संक्रमित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली सारख्या खेळाडूंची बॅट बनवणारे अशरफ चौधरी यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांना अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.

क्रिकेट जगतात अशरफ चाचा म्हणून ओळख असणारे अशरफ चौधरी हे काही दिवसांपूर्वी चेंबूरच्या एका हॉस्पिटल मध्ये भर्ती होते. ते अनेक आजारांनी ग्रस्त होते, त्यांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे.

सेव्हन हिल्स हॉस्पिटल मधील रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. भुजंग पाई यांनी सांगितलं की चेंबूरच्या हॉस्पिटल मध्ये अशरफचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांना आता सेव्हन हिल्स हॉस्पिटल भरती करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ते म्हणाले, अशरफ चाचाला सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ते चेंबूरच्या हॉस्पिटल मध्ये असताना सचिन तेंडुलकरने त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली होती.

तेंडुलकर, कोहली सोबतच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, वेस्ट इंडिजचा क्रिस गेल आणि पोलार्ड यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी अशरफ चौधरी यांनी बनवलेल्या बॅट चा वापर केला आहे.