‘कोरोना’ लसीचा मोफत डोस देणार, ‘या’ देशाने केली घोषणा

पोलिसनामा ऑनलाईन – अनेक देश कोरोनावरील लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियाने तर लस विकसित केल्याचाही दावा केला आहे. दुसरीकडे लस उपलब्ध झाल्यानंतर ती सर्वसामान्य लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, त्यासाठी किती पैसे मोजावे लागणार असे अनेक प्रश्न समोर आहेत. त्यासाठी ऑस्ट्रेलियाने लस उपलब्ध झाल्यानंतर देशवासियांना मोफत डोस दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत कोरोना लस विकसित करणार्‍या औषध कंपनीसोबत करार केला आहे. कोरोना लस यशस्वी झाली तर आम्ही त्याची निर्मिती करुन आणि पुरवठाही सुरु करु. ऑस्ट्रेलियातील 25 कोटी नागरिकांना ती मोफत उपलब्ध असेल, असे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले आहे. ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 23 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 430 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारताने कोरोना लस विकसित करणार्‍या तीन कंपन्यांना लस उपलब्ध झाल्यास कोणत्या किंमतीत ती उपलब्ध करु शकतो यासंबंधी विचारणा केली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेक आणि अहमदाबाद स्थित झायडूस कॅडिला सध्या पहिला आणि दुसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणी करत आहेत.