‘कोरोना बारात लेकर आ रहा, नाराज फूफा बनकर बैठें’ अश्या घोषणांनी भरल्या भिंती, ‘या’ गावात अनोखी जनजागृती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा कहर अद्याप सुरूच आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व उपाययोजना करीत आहेत. लोकांमध्ये जनजागृती मोहीमही राबविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून एक प्रकरण समोर आले आहे, जिथे कोरोनाशी संबंधित अनेक मनोरंजक घोषणा भिंतींवरही लिहिल्या गेल्या आहेत. फिरोजाबाद जिल्ह्यातील मदनपूर ब्लॉकमधील अनेक ठिकाणी भिंतींवर जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांद्वारे संदेश देण्यात आले आहेत. ज्यात लिहिले आहे कि, “ कोरोना वायरस बारात लेकर आ रहा है, बुआ की तरह डांस नहीं करें बल्कि शादी में फूफा की तरह मुंह फुला कर बैठे रहें.’ अशा अनेक घोषणा भिंतींवर लिहिल्या गेल्या आहेत, जे लोकांमध्ये चर्चेचा विषय बनत आहेत.

फिरोजाबादमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, संक्रमितांचा आकडा वाढून 508 वर पोहोचला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने हे अनोखे पाऊल उचलले आहे. मदनपूर ब्लॉकच्या बीडीओने हा पुढाकार घेतला आणि खेड्यात अनेक घोषणा लिहिल्या. लोक केवळ या घोषणा वाचतच नाहीत तर त्याबद्दल चर्चाही करत आहेत.

नरेंद्र कुमार नावाच्या गावकऱ्याने सांगितले की, जागोजागी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत, लोक वाचत आहेत आणि जागरूकही होत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, अशाप्रकारे लिहिल्यामुळे लोकांमध्ये किमान चर्चा होते आणि लोक कोरोनाची भीती समजून घेत आहेत. ब्लॉक मदनपूरचे बीडीओ महेशचंद्र त्रिपाठी म्हणतात की, या घोषणांना चांगलीच दाद मिळाली, लोक रस घेत आहेत. ते म्हणाले की जिल्हा दंडाधिका्यांनीही या कामाचे कौतुक केले आहे.