Coronavirus : राजस्थानमध्ये सुरू झालं ‘कोरोना’वरील आयुर्वेदिक औषधांचं क्लिनिकल ट्रायल

जयपुर : कोरोनावर उपाय शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. अनेक देशातील कंपन्यांनी औषधाच्या अगदी जवळ पोहचल्याचा दावा केला आहे. या दरम्यान भारतात सुद्धा आयुर्वेद औषधांची कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर क्लिनिकल ट्रायल सुरू झाली आहे. राजस्थानच्या जयपुरमध्ये कोरोनाच्या रूग्णांवर आयुर्वेदिक औषधांची चाचणी केली जात आहे.

जयपुरच्या रामगंजमध्ये 12000 लोकांवर आयुर्वेदातील एका इम्यूनिटी औषधाची टेस्टिंग सुद्धा सुरू केली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय ही ट्रायल क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायजेशन टीमच्या सोबत मिळून करत आहे. आयुष मंत्रालयाअंतर्गत काम करणार्‍या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानने कोरोनावर चार औषधे बनवली आहेत, ज्यापैकी एकाचे नाव आहे आयुष 64. याबाबत आयुष मंत्रालयाला खुप अपेक्षा आहेत.

राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान जयपुरने कोरोनाच्या रूग्णांवर याची क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे. ही ट्रायल कोविड-19 च्या प्रथम स्टेजच्या रूग्णांवर जयपुरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. आयुर्वेद संस्थानचे संचालक संजीव शर्मा यांचे म्हणणे आहे की, हे औषध सामान्यपणे यापूर्वी मलेरियासाठी दिले जात होते, परंतु यामध्ये काही बदल करून कोरोना रूग्णांसाठी दिले जात आहे.

त्यांनी म्हटले की, याचे संशोधन करण्यासाठी क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनचे सहकार्य घेतले जात आहे. आयुर्वेद संस्थानच्या संचालकांनी म्हटले आहे की, तीन ते चार महीन्यात याचा रिझल्ट समोर येईल. सुरूवातीचे परिणाम चांगले दिसत आहेत. याशिवाय 12000 लोकांना घेऊन आयुर्वेदिक औषध संशमनी बुटीच्या इम्युनिटी बुस्टरची ट्रायल सुद्धा सुरू करण्यात आली आहे. रामगंज सारख्या कंटेन्मेंट एरियातील लोकांना या औषधाच्या दोन-दोन गोळ्या सकाळ-संध्याकाळ देण्यात येत आहेत. 45 दिवसानंतर परिणामाचा अभ्यास करण्यात येईल.

केंद्र सरकारची इच्छा होती की, राज्य सरकारांसह एकत्र सरकारी दवाखान्यांमध्ये क्लिनिकल ट्रायल करण्यात यावी, परंतु गेहलोत सरकारने यास परवानगी दिली नाही. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांनी म्हटले की, आम्ही या परवानगीसाठी फाईल राज्यपालांना पाठवली आहे. सूत्रांच्यानुसार राजस्थान सरकारकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, भारत सरकार याची क्लिनिकल ट्रायल दिल्लीमध्ये का करत नाही?

आतापर्यंतचे परिणाम सकारात्मक

राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानकडून कोरोनाबाबत वेगवेगळ्या स्तरावर रिसर्च केले जात आहेत. यामध्ये इम्युनिटी बुस्टर किट सुद्धा आहे आणि च्यवनप्राश सुद्धा आहे. जयपुरच्या हाय रिस्क झोनमध्ये राहणार्‍या सुमारे 5000 लोकांवर याची ट्रायल मागील 1 महीन्यापासून जास्त वेळ सुरू आहे आणि आतापर्यंत परिणाम चांगले असल्याचा दावा केला जात आहे.