Coronavirus : बांग्लादेशी डॉक्टरांनी शोधला उपचार, 60 ‘कोरोना’ग्रस्तांवर टेस्ट, सर्वजण बरे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या उपचारासाठी अनेक देश संशोधन करत आहेत. मात्र, अद्याप कोणालाही यश आलेले नाही. यादरम्यान, बांग्लादेशच्या वैद्यकीय पथकाने दावा केला आहे की, त्यांनी कोरोना विषाणूच्या औषधावर संशोधन केले आहे आणि त्यांना यशही मिळाले आहे. माहितीनुसार दोन औषधांच्या संयोजनामुळे कोरोनाचे रुग्ण वेगाने बरे होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोनाचे औषध शोधल्याचा दावा करणाऱ्या बांग्लादेशच्या वैद्यकीय पथकात देशातील नामांकित डॉक्टरांचा समावेश आहे. देशातील प्रमुख खाजगी संस्था बांग्लादेश मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (बीएमसीएच) चे औषध विभाग प्रमुख डॉ. मोहम्मद तारेक आलम यांनी सांगितले आहे की, आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या दोन औषधांचे मिश्रण वापरले गेले होते. आणि कोरोनाच्या 60 रूग्णांना औषधांचे मिश्रण दिले गेले, त्यानंतर सर्व रुग्ण बरे झाले. आलम हे बांग्लादेशाचे नामांकित डॉक्टर आहे. ते म्हणाले की, रूग्णांना इव्हरमेक्टिन आणि डॉक्सीसीक्लिन ही औषधे दिली गेली. डोक्सीसीक्लिन एक प्रतिजैविक आहे, तर इव्हरमेक्टिन औषध अँटीप्रोटोझोल औषध म्हणून वापरले जाते.

डॉ.आलम म्हणाले की, त्यांच्या पथकाने ही दोन्ही औषधे केवळ कोरोना रूग्णांसाठी वापरली. या रूग्णांना सुरुवातीला श्वासोच्छवासाची समस्या होती आणि त्यांचा निकाल तपासणीत कोरोना सकारात्मक आला. ते पुढे म्हणाले कि, हे औषध इतके प्रभावी होते की आजारी रुग्ण 4 दिवसात बरे झाले. रुग्णांची लक्षण तीन दिवसात गायब झाली. तसेच महत्वाचे म्हणेज औषधाचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. त्यामुळे 100 टक्के औषध प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, सरकारी अधिकार्‍यांशीही या औषधाविषयी बोलले गेले आहे जेणेकरून आंतरराष्ट्रीय प्रक्रियेचे पालन करून जगाला कोरोना विषाणूच्या उपचारांविषयी माहिती दिली जाऊ शकेल.

डॉ. आलम यांनी सांगितले कि, त्यांची टीम रिसर्च पेपर तयार करीत आहे, जे आंतरराष्ट्रीय जनरलमध्ये प्रकाशित केले जाईल. यानंतर, जगभरातील डॉक्टर बांग्लादेशातील डॉक्टरांच्या संशोधनाचा आढावा घेण्यास सक्षम असतील. दरम्यान, बांग्लादेशात कोरोनाचे 22 हजाराहून अधिक रुग्ण आढळले असून 320 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.