तुझ्यामुळं गावात कोरोना होतोय ! आरोग्य कर्मचार्‍यास बार्शी येथे जबर मारहाण

सोलापूर: पोलीसनामा ऑनलाइन – तुझ्यामुळे कोरोना होईल, तू हॉस्पिटलला जाऊ नको, म्हणून बार्शी येथे वैद्यकीय कर्मचाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीत तो कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यास सोलापूर च्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य कर्मचारी (Villagers beaten Health worker) प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांवरच हल्ला होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सौंदरे गावात एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्माचाऱ्याला दररोज रुग्णालयात कामासाठी जातो म्हणून तीन गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत रुग्णालय कर्मचारी सुजित कुंभारे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सुजित कुंभारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे (Villagers beaten Health worker).

“रुग्णालयात कामासाठी का जातो? तुझ्याामुळे गावातील सर्वांना कोरोना होईल. तू रुग्णालयात कामाला जाऊ नको आणि गेलास तर रुग्णालयातच राहा, परत इकडे येऊ नको”, असं म्हणत सौंदरे गावाच्या एकाच कुटुंबातील तीन जणांनी मिळून सुजित कुंभारे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुंभारे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या बार्शीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सौंदरे गावाचे रहिवासी सुजित कुंभारे हे गावाजवळ असलेल्या बार्शीतल्या एका खासगी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. सुजित हे गेल्या 14 वर्षांपासून या रुग्णालयाच्या न्यूरो विभागात काम करतात. मात्र, गावातील एकाच कुटुंबातील तीन जाणांनी एकत्र येऊन सुजित कुंभारे यांना रुग्णालयात कामासाठी जातो म्हणून मारहाण केली.

दरम्यान, सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांनी शंभरी गाठली आहे. कोरोनाचे काल (30 एप्रिल) दिवसभरात 21 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 102 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 3 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर अशाप्रकारे हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, आरोग्य कर्माचारी, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.तरीही लोक कोरोना च्या भीती मुळे वैधकीय कर्मचारी व पोलीस यांना मारहाण करण्याचे प्रकार सुरूच आहेत ते त्वरित थांबवावेत अन्यथा या वर आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा सिव्हील हॉस्पिटल रोजंदारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि भिम शक्ती समाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष संजय रणदिवे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.