भीतीमुळे कोविड सेंटरमध्येच गळफास घेऊन आत्महत्या !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या भीतीमुळे कोरोनाच्या संशयित रुग्णाने कोव्हिड सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुकाराम जगन्नाथ जाधव असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे.त्याचा अहवाल येण्या आधीच त्याने क्वारन्टाइन सेंटरमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरोनाच्या भीतीने तुकाराम जाधव यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

ज्यावेळी तेथील न.प.कर्मचार्‍यांनी त्यांचा जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले तेव्हा दार न उघडल्याने कर्मचार्‍यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता तुकारामने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर दरवाजा तोडून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्येही अशीच एक घटना घडली होती. कोरोनाच्या भीतीमुळेच मत्स्य विक्री करणार्‍या एका व्यक्तीने काकडवाल गावातील स्मशानभूमीत गळफास लावून आत्महत्या केली. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव झाल्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज अधिकच वाढले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like