Coronavirus : इस्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितला कोरोनापासून बचावाचा भारतीय ‘फॉर्म्युला’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे 77 देशातील लोकांना फटका बसला आहे. या व्हायरसमुळे तब्बल 3,000 हजार लोकांचा जीव घेतला आहे. यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दरम्यान एक भारतीय पद्धत सांगितली आहे आणि इस्रायली नागरिकांना ही पद्धत फॉलो करण्यास सांगितली आहे.

बेंजामिन नेतान्याहू यांनी एका प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सांगितले की व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपायांची घोषणा केली जाईल. परंतु काही साधारण पद्धती आहेत, जसे की हस्तांदोलन करण्याऐवजी भारतीय पद्धतीने नमस्ते केले जाऊ शकते. त्यांनी आपले दोन हात जोडून करुन दाखवले की भारतीय कशा प्रकारे नमस्ते करतात.

इस्रायलचे पंतप्रधान आणि भारताचे पीएम नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्यांना नमस्ते करायला शिकवले आणि नेतान्याहू यांनी ही पद्धत त्यांच्या देशवासियांना शिकवली. ते म्हणाले की ही भारतीय पद्धत कोरोना पसरण्याला रोखेल.

उल्लेखनीय आहे की कोरोना व्हायरस एकमेकांना स्पर्श केल्याने पसरतो. तज्ज्ञांनी हा दावा केला की हा व्हायरस 1 मीटर अंतराच्या परिसरात असल्यास कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो.