Coronavirus : ‘भाईजान’ सलमानचं ‘कोरोना’वरील खास गाणं रिलीज ! 5 मिनिटातच लिहिले ‘लिरीक्स’, ‘अशी’ आहे गाण्याची स्टोरी

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सलमान खाननं गायलेलं कोरोनावरील गाणं रिलीज झालं आहे. प्यार करोना असं या गाण्याचं नाव आहे. खास बात अशी की, हे गाणं सलमान खाननंच लिहिलं असून त्यानंच गायलं आहे. सलमान खाननं गाण्याच्यामध्ये रॅपही केला आहे. आत त्याच्या चाहत्यांनाही त्याचं गाणं आवडलं आहे असं दिसतंय. या गाण्यातून सलमान खाननं लोकांमध्ये जागरूकता केली आहे. सोबतच कोरोनापासून वाचण्याचे उपायदेखील त्यानं सांगितले आहेत.

सलमान खाननं एका मुलाखतीत या गाण्याबद्दल सांगितलं आहे. सलमान म्हणाला, “या गाण्याचे लिरीक्स लिहिलण्यासाठी फक्त 5 मिनिटे लागली होती. दीर्घकाळापासून प्यार करोना सारखी ट्युन डोक्यात घुमत होती. त्यामुळं यावर काम करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या पाच मिनिटात हे गाणं लिहून झालं.” या गाण्यात फक्त कोरोनाबद्दलच भाष्य करण्यात आलं आहे.

हे फक्त हे ऑडिओ साँग आहे ज्याला सलमान खानचा आवाज आहे. हे गाणं अनेक म्युझिक अॅप तसेच म्यझिक युट्युबवरही ऐकलं जाऊ शकतं. यात त्यानं घरातच राहण्याचाही सल्ला दिला आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमा रिलीज होईल असं वाटत नाही.