Coronavirus : ‘बिग बी’ अमिताभ बच्चन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांची देखील चाचणी झाली आहे पण अद्याप रिपोर्ट आलेले नाहीत. गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी असे अमिताभ यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

दरम्यान, अमिताभ यांना कोरोना झाल्याचे समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like