Coronavirus : Big B अमिताभनं ‘कोरोना’वर सांगितले ‘हे’ 3 महत्त्वाचे उपाय, हात जोडून म्हणाले… (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हायरसमुळं सध्या देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. 24 मार्च 2020 पासून हा लॉकडाऊन लागू झाला आहे. अशा सर्व लोक कोरोनाची लढाई लढण्यासाठी सहकार्य करत आहेत. अनेक कलाकारही त्यांच्या पद्धतीनं लोकांना जागरूक करत आहेत. कोरोनाबद्दल काही माहिती समोर येत असेल तर तीही लोकांपर्यंत सोशलच्या माध्यमातून पसरवली जात आहे. अशात बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनीही एक महत्त्वाची माहिती सोशलवर शेअर केली आहे.

https://twitter.com/SrBachchan/status/1242820488562216961

बिग बींनी त्यांचा एक व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. व्हिडीओत बिग बी म्हणतात, “अलीकडेच चीनच्या संशोधकांना असं आढळलं आहे की, कोरोना व्हायरस मानवी मलमूत्र किंवा विष्ठेवर अनेक आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो. कोरोनाचा रुग्ण पूर्णपणे नीट झाला तरी काही आठवडे त्याचं मलमूत्र किंवा विष्ठेवर कोरोना व्हायरस जिवंत राहू शकतो. जर अशा एखाद्या व्यक्तीच्या मलमूत्रावर एखादी माशी बसली आणि तीच माशी भाज्या, फळे किंवा अन्नावर बसली तर ही महामारी अजून पररू शकते.”

पुढे बिग बी म्हणतात, “कोरोनासोबत लढण्यासाठी आपण एक जन आंदोलन तयार करू. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, कोरोना व्हायसपासून देशाला वाचवण्यासाठी तीन कार्यातून सहकार्य करा. पहिलं आपल्या शौचालयाचाच वापर करा. खुल्यात शौच करू नका. दुसरं आहे सोशलर डिस्टंसिंग. तिसरं आहे दिवसातून अनेक वेळा आपले हात साबणानं किमान 20 सेकंद तरी धुवा. डोळ, नाक आणि तोंडाला थेट स्पर्श करणे टाळा. कोरोनाला हरवण्यासाठी हे लक्षात घ्यायला हवं की, दरवाजा बंद तर आजार बंद.”