Coronavirus : भारतासाठी खुपच घातक ठरला हा आठवडा ! 24 तासात ‘कोरोना’चे 40425 नवे पॉझिटिव्ह, 7 दिवसात समोर आले 2.4 लाख रूग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दररोज उच्चांकवर उच्चांक गाठतच आहे. देशात सध्या 11 लाख 18 हजार 43 कोरोनाबाधित आहेत. रविवारी भारतात आतापर्यंतचे एका दिवशी सर्वात जास्त 40 हजार 253 रुग्ण सापडले आहेत. याअगोदर शनिवारी 38 हजार 902 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण सापडले होते. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण(रिकव्हरी रेट) जवळपास 63 टक्के आहे. आतापर्यंत 7 लाख 339 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही बाब जरी दिलासादायक असली तरी दिवसेंदिवस वाढत असणारा कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा आकडा धडकीच भरवणारा आहे.

 

 

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाच्या सध्या 3 लाख 90 हजार 459 ऍक्टिव्ह केस आहेत. भारतातील काही राज्यात लॉकडाउन नंतर अनलॉक केल्यावर रुग्णांचा आकडा चांगलाच वाढला आहे. यामुळे आता त्या राज्यांत अजून एकदा लॉकडाउन होत आहे. या अनलॉकचाच एक दुष्परिणाम म्हणजे गेल्या एका आठवड्यांत वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या होय. 22 ते 28 जून यादरम्यान भारतात एकूण 1.2 लाख कोरोनाचे रुग्ण सापडले होते. यानंतर 29 जून ते 5 जुलै दरम्यान 1.5 रुग्ण मिळाले होते. तसेच 6 ते 13 जुलै दरम्यान 1.8 लाख रुग्ण आढळले आहेत. महत्वाचे म्हणजे 14 ते 19 जुलै या आठवड्यात 2.4 लोकांना कोरोना झाला आहे. ही सर्वच आकडेवारी चांगलीच चक्रावणारी आहे.

राज्यांच्या बाबतीत विचार केला तर सगळ्यात जास्त कोरोनाची लागण महाराष्ट्र या राज्यात झाली आहे. महाराष्ट्राने 3 लाखांचा आकडा पार केला आहे. तसेच 11 हजार 854 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि दिल्ली अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. या पाच राज्यात आता सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह केस आहेत