भाजपच्या माजी आमदाराचे लोकप्रियतेसाठी काय पण ! थेट ऑक्सिजन सिलेंडरवरच लावले स्वत:चे फोटो

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शेकडो रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज भासत आहे. असे असताना दुसरीकडे मात्र भाजपच्या माजी आमदाराने लोकप्रियतेसाठी थेट ऑक्सिजन सिलेंडरवरच स्वत:चे फोटो लावले आहेत.

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि कोरोना लसींवरून राजकारण केले जात आहे. असे असताना आता भाजपचे अमरेलीतील माजी आमदार हिरा सोलंकी यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने 25 बेड्सचे कोविड सेंटर उभारले आहे. मात्र, येथे हिरा सोलंकी यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्याच्या लोकप्रियतेसाठी ऑक्सिजन सिलेंडरवर त्यांचे पोस्टर्स छापले आहेत.

दरम्यान, हिरा सोलंकी यांनी कोविड सेंटर उभारल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र, त्यांनी ऑक्सिजन सिलेंडरवरच स्वत:चे पोस्टर्स छापल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या ऑक्सिजनचे सिलेंडरचे फोटोही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरस होत आहेत.