बनावट रेमडेसिवीर रॅकेटमधील एक आरोपी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा भाजपाकडून दावा, थेट अजितदादांसोबतचा फोटो शेअर करत भातखळकर म्हणाले…

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असतानाच दुसरीकडे राज्य सरकार आणि विरोधक परस्परांस जुंपली आहेत. गेल्या काही दिवसात बारामतीत मोकळ्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटीमॉल टाकून ३५ हजार रुपयांना एक रेमडेसिविर इंजेक्शन म्हणून विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. त्या टोळीतील एक आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजप पक्षाकडून केला आहे.

File photo

या प्रकरणावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर गंभीर टीका केलीय. अतुल भातखळकर म्हणाले, साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम, राष्ट्रवादी पुन्हा लावतात लोकांना चुना. हे शक्य झालंय साहेबांच्या धोरणामुळे, असा टोला सणसणीत टोला भातखळकर यांनी लगावला आहे. असे या घटनेचीबाबत बातमी शेअर करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट केले आहे.

दरम्यान, या बनावट रेमडेसिविर विक्रीमध्ये बारामतीतील एका कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा यामध्ये सहभाग आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला देखील मोठा धक्का बसला आहे. या टोळीतील मुख्य सुत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय ३५, रा. काटेवाडी, ता. बारामती) हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच, प्रशांत सिध्देश्वर घरत (वय २३, रा. भवानीनगर, ता. इंदापूर), संदिप संजय गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), शंकर दादा भिसे (वय २२, रा. काटेवाडी, ता. बारामती) या सर्वाना बारामती ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.