‘या’ पध्दतीनं मास्क परिधान केल्यास कोविडसह ब्लॅक फंगस आजार उद्भवण्यास मदत, तज्ज्ञ म्हणतात..

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोनाच्या प्रादुर्भावात विषाणूपासून बचाव करण्यासाठी अनेकांना मास्क घालणे आवश्यकच झालं आहे. अनेक डॉक्टर, तज्ज्ञ, WHO यांच्याकडून मास्क घालण्याविषयी अधिक सल्ला दिला जात आहे. मात्र लोक जे मास्क घालतात ते मास्क कसे असल्याला हवेत याविषयी देखील तज्ज्ञ सांगत असतात. तसेच मास्कचा वापर किती वेळ करावा? मास्कचा वापर चुकीच्या पद्धतीनं केल्यावर कोणत्या आजारांचा धोका वाढतो? यावरून नागरिकांमध्ये प्रश्नांचा गोंधळ निर्माण होतो. याबाबत डॉ. राजन गांधी यांनी माहिती दिलीय. ते जाणून घ्या.

१. घाणेरडा मास्क आजारात अडकवू शकतो –

कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी लोकांना मास्क घालणे आवश्यक आहे. मात्र तो मास्क घाणेरडा अथवा तोच तोच मास्क अधिक काळ परिधान केला असल्याने तो मास्क आपल्याला कोरोनापासून वाचवण्याऐवजी अन्य काही आजारात अडकवू शकतो. घसा खवखवणे, श्वसनविषयक समस्या आणि पोटाचे विकार उद्भवू शकतात. तसेच, स्वच्छ मास्क असल्याने श्वास घेण्यास अडचण निर्माण होत नाही. मात्र, मास्क घाण असल्याने त्याचे छिद्र घाणीने भरले जातात त्यावेळी मास्कच्या वापरामुळे ऑक्सिजनच्या पातळीत कमतरता जाणवू शकते. म्हणून गुदमरल्यासारखे अथवा श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते.

२. मास्क कधी बदलायचा –

कापडाचा मास्क अधिकाधिक ३ महिन्यांपर्यंत वापरायला हवा. त्यानंतर तो मास्क बदलून दुसरा घ्या. डिस्पोजेबल N95 मास्क दर २ महिन्यांनी बदलायला हवा. जवळपास ३ ते ४ तासांच्या वापरानंतर सर्जिकल थ्री लेयर मास्क बदलणे हा एक चांगला पर्याय आहे. तर , रियुजेबल मास्क दर २ महिन्यांनी बदलणे आवश्यक.

३. कशी आहे मास्क स्वच्छ करण्याची योग्य पद्धत?

अधिक काळ कापडाचा मास्क परिधान केल्यावर केवळ पाण्याने धुवून चालणार नाही. हाच मास्क जवळजवळ १० मिनिटं गरम पाण्यात बुडवायला हवा. तसेच ते झाल्यावर साबणाने धुवून काढायला हवा. व्यवस्थित सुकल्यावर झाल्यानंतरच त्या मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. मास्क सुकल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही वारंवार हात लावायला जात नाही अशा ठिकाणी ठेवा. मास्क वापरण्याआधी आपले हात सॅनिटाईज करणे गरजेचे आहे.

संशोधकाच्या अभ्यासानुसार, एकच मास्क सतत परिधान करणे हे विनामास्क फिरण्यापेक्षा अधिक धोकादायक आहे. वापरलेला मास्क पुन्हा वापरणे हे मास्क न घालण्यापेक्षा कमी सुरक्षित असू शकते. असे अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ आणि कॅलिफोर्नियाच्या बॅपटिस्ट विद्यापीठाच्या संशोधकाच्या टीमने मास्क प्रभावी आहेत की नाही यावर संशोधन केले आहे. तसेच, द्रव्यांचे भौतिकशास्त्र जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संशोधकांचे म्हणणे आहे की, जेवढ्या अधिकवेळा ते मास्क वापरले जाते तेवढे ते खराब होत जाते. जगातील सामान्य लोकांना ३ लेअरच्या मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. काही एक्सपर्ट N 95 मास्क घालण्याचा सल्ला देतात. मात्र, N95 हे मास्क महागडे असतात. तसेच ते सामान्यांना सहज उपलब्धही होत नाहीत. संशोधनात ३ लेअर असलेल्या सर्जिकल मास्कची तपासणी करण्यात आली आहे. म्हणून हे मास्क नवीन असताना छोट्या आकाराच्या ३ चतुर्थांश कणांना रोखण्यात यशस्वी ठरतात. असे संशोधनाकडून सांगण्यात आले आहे.