…तर आम्ही देशाला मुंबई मॉडेल कसं समजवून सांगणार? – आयुक्त इक्बालसिंग चहल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात अधिक लोकसंख्या असणाऱ्या मुंबईची अवस्था कोरोनाने भरली होती. मुंबईमध्ये एप्रिल महिन्यापासून बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. मात्र कोरोनाला अटकाव घालण्यासाठी मुंबई शहरात महापालिकेने अनेक वेगवेगळ्या योजनेची मोहीम हाती घेतल्याने बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. यामुळे बुधवारी सुप्रीम कोर्टाने मुंबई महानगरपालिकेच्या कामगिरीचं कौतुक करत मुंबई मॉडेल सारख्या अन्य काही ठिकाणी सुविधा करता येऊ शकतात का हे तपासण्याचे आदेश देखील सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले आहे. यावरून आता आमच्यावर हसवण्याचंच ठरवलं असेल तर आम्ही देशाला मुंबई मॉडेल कसं समजवून सांगणार?” अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली आहे.

आयुक्त चहल म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी मला भारतीय प्रशासनात काम करणारे मित्र फोन करुन केवळ महाराष्ट्रातच कोरोना आहे का? असे सवाल करत हसत होते. जर एखादी व्यक्ती आपल्यावर हसत असेल तर मी माझी काम करण्याच्या मॉडेलसंदर्भात त्यांना कसे सांगेन? जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिकण्याची वेळ नसते, तेव्हा त्या मॉडेल्सप्रमाणे काम करण्यासाठी देखील वेळ मिळत नाही, असे ते म्हणाले. तसेच, वाढत्या कोव्हिडच्या संकटावर प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर मुंबई मॉडेल इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये राबवता येऊ शकते असे मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी सांगितले आहे. या दरम्यान, मुंबईत आधीच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी तयारी करत आहे. अधिक जम्बो सुविधा असलेले साधारण ५ हजार ५०० बेड्स उपलब्ध करत आहोत यामधील ७० टक्के हे प्राणवायू बेड्स असतील असे आयुक्त चहल यांनी सांगितले आहे.

महापालिका आयुक्त चहल पुढे म्हणाले, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बेड्स वाढवण्याची सक्ती करू नये असे दिल्ली सरकारला मी सांगितले आहे. ऑक्सिजनयुक्त बेड वाढवल्याने रुग्णालयांकडून SOS कॉल वाढत आहेत. म्हणून प्राणवायू मिळत नाही. तसेच, असे उपलब्ध प्राणवायूचा योग्य उपयोग आणि योग्य वितरण आणि बफर स्टॉक तयार ठेवणे यामुळे मुंबईची प्राणवायू समस्या आता इतिहास जमा झाली आहे, असे ते म्हणाले, तर प्राणवायूच्या कमतरतेमुळे मुंबईमध्ये कोणताही मृत्यू झाला नाही, तर परंतु, एका मध्यरात्री आलेल्या संकटाबाबत बोलताना म्हटले की, १६, १७ एप्रिल महिन्याच्या मध्यरात्री प्राणवायूचा कमी पुरवठ्यामुळे ६ रुग्णालयातील १६८ रुग्णांना संरक्षण स्थळी दाखल करून शंभर टक्के सर्वांचा प्राण वाचवला याचा मला आनंद झाला. असे आयुक्त चहल यांनी म्हटले आहे.

या दरम्यान, आयुक्त इक्बालसिंग चहल माहिती देताना म्हटले की, रात्रीच्या घटनेनंतर राज्याच्या टास्क फोर्ससोबत संपर्क साधत आम्ही प्राणवायूच्या वापरासाठी प्रोटोकॉल ठरवण्याची विनंती केली. प्राणवायूचे कुठलेही प्रश्न उद्भवू नयेत यासाठी केंद्रात पोस्टिंग दरम्यान बरोबर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत आपण दिल्लीतही याबाबत बोललो आहे. मी केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृहसचिव आणि आरोग्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील ८ मुख्य राजकारण्यांनाही यासंदर्भात सांगितले, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त चहल यांनीं दिलीय.