Coronavirus | काय सांगता ! होय, कोरोनाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेने केले तब्बल 2 हजार कोटी रूपये खर्च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Coronavirus | मागील दोन ते तीन महिन्यात राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Corona virus) अधिक वेग घेतला होता. मात्र सध्या राज्यातील परिस्थिती आटोक्यात आली आहे. मुबंईत देखील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. बाधितांची संख्या देखील घटली आहे. असे असतानाच आता एक मोठी माहिती समोर आलीय. मुंबई महापालिकेने (BMC) कोरोनासाठी 2 हजार कोटी रुपये (2 thousand crore) खर्च केल्याची माहिती पुढं आली आहे. मार्च 2020 ते जुलै 2021 या काळात मुंबई पालिकेनं कोरोनावर कोट्यवधी खर्च केल्याचे समजते आहे. अर्थात प्रत्येक महिन्यात पालिका साधारण 200 कोटी खर्च करत आहे.

मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या लाटेनं सुरुवात केलीय. तेव्हापासून मंबई पालिकेनं (BMC) मुंबईत 14 जम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid Center),आणि कोरोना केअर सेंटर (Corona Care Center) सुरु केले.
तसेच, कॉन्ट्रॅक्टवर कर्मचाऱ्यांची भरती, वैद्यकीय उपकरणे खरेदी, अत्यावश्यक सेवांबाबत कर्मचाऱ्यांशी संबंधित हॉटेल खर्च, कोरोना बाधित भागात खाण्यापिण्याचा पुरवठा अशा सारख्या इतर कामांसाठी मुंबई पालिकेनं (BMC) 1600 कोटी रुपये खर्च केले आहे.
त्याचबरोबर मास्क खरेदी, ऑक्सिजन प्लांट तयार करणं, औषधांची निर्मिती अशा बाबीवर पालिकेनं 2 हजार कोटी रुपये खर्च केल्याचं समजते.
गतवर्षीपासून मुंबईत कोरोनाच्या उद्रेकामुळे आकस्मिकता निधीतून (contingency fund) 1632.64 कोटी रुपये खर्च केले.
इतर 400 कोटी रुपये खर्च करण्यासाठी मार्च 2021 मध्ये परवानगी घेतली गेली.

 

कोविड नियंत्रणासाठी प्रति महिना 200 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid Center), कोरोना केअर सेंटर (Corona Care Center) आतापर्यंत तयार झालेत.
त्यामुळे आता त्याची फक्त काळजी आणि देखभाल करणं आवश्यक आहे.
त्यामुळे आता कोरोनाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता नाही, असं मुंबई पालिकेनं (BMC)
स्पष्ट केलं आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असल्याचं समजते.
दरम्यान, कोरोनाच्या काळात पालिकेनं स्वतः ऑक्सिजन बनवण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर एकूण 12 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बनवणारे प्लांट तयार करत आहे.
तसेच, ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी केली जात आहे. या सर्वासाठी एकूण 400 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
दरम्यान, मुंबई पालिकेच्या (BMC) अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी जवळपास 4 हजार 728 कोटी रुपयांचे नियोजन केले असल्याचे साजते.

Web Title : coronavirus | bmc spent two thousand crores to fight corona in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune | पुण्यात बेरोजगार झालेल्यांना मिळणार रोजगाराची संधी ! पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतला पुढाकर, जाणून घ्या

Chandrasekhar Bavankule | ’14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?’

Anti Corruption Pune | पिंपरीनंतर आता पुणे मनपातील बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ