‘भाईजान’ सलमान खान बॅकस्टेज कामगारांसाठी ठरला ‘देवदूत’, खात्यात जमा केले 4 कोटी 80 लाख रूपये

 पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक बांधिलकी जपत अभिनेता सलमान खानने बॅकस्टेज काम करणार्‍या कामगारांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनामुळे मालिका, चित्रपटांचे शूटिंग बंद असल्याने अनेक स्पॉट बॉय आणि फिल्म लाइन कामगारही आर्थिक संकटात आहे. त्यामुळे सलमानने 16 हजार कामगारांच्या खात्यात थेट 4 कोटी 80 लाखांची रक्कम जमा केली आहे.

कोरोनाच्या लढ्यासाठी सलमान खानने चित्रपटसृष्टीतीला 25 हजार कामगारांना मदत करण्याचे सांगितले होते. त्यानुसार त्याने मदत करण्यास सुरुवात केली आहे. सलमानने सध्या 16 हजार कामगारांच्या खात्यात एकूण 4 कोटी 80 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती पाहता मदत वाढवली जाणार आहे. सलमान मे महिन्यात आणखी 19 हजार कामगारांना मदत करणार आहे.

चित्रपटष्टीतील कामगारांना 10 कोटी 50 लाख रुपयांची मदत करणार असल्याचे सलमानने जाहीर केले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात त्याने 16 हजार कामगारांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत. दुसर्‍या टप्प्यात सलमान खान 19 हजार कामगारांना मदत करणार असून पाच कोटी 70 लाख रुपये खर्च करणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like