Coronavirus : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढं आलं बॉलिवूड, कपिलनं दिले 50 लाख तर पवननं दिले 1 कोटी


पोलीसनामा ऑनलाईन :
कोरोना व्हायरससोबत लढा देण्यासाठी एंटरटेंमेंट इंडस्ट्री एकजुटीनं उभी राहिली आहे. अनेक स्टार्स पीएम रिलीफ फंडासाठी डोनेट करताना दिसत आहे. कपिल शर्मापासून तर अनेक स्टार्स असे आहेत ज्यांनी पैसे डोनेट केले आहेत.

कपिल शर्मानं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये कपिल शर्मा म्हणतो, “ही वेळ सोबत उभं राहण्याची आहे ज्यांना आपली गरज आहे त्यांना साथ देण्याची आहे. पीएम मोदी रिलीफ फंडासाठी 50 लाख रुपये देत आहे. सर्वांना विनंती आहे की, घरीच रहा. सुरक्षित रहा.”

साऊथ सुपरस्टार पवन कल्याण यानंही पैसे डोनेट केले आहेत. पवन कल्याण यानं ट्विट करत लिहिलं की, “मी पीएम रिलीफ फंडासाठी 1 कोटी रुपये डोनेट करत आहे. पीएम नरेंद्र मोदीची इंस्पायरींग लिडरशिप कोरोना महामारीतून आपल्याला तारणार आहे.” असंही तो म्हणाला.

साऊथ अ‍ॅक्टर राम चरण यानंही 70 लाख रुपये डोनेट केले आहेत. एकता कपूरनंही ट्विट केलं आहे. या जन आंदोलनात सर्वांना योगदान देण्यासाठी तिनं सांगितलं आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकरी या स्टार लोकांचं कौतुक करताना दिसत आहे ज्यांनी कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

You might also like